सातारा समाचार
February 14 at 6:43pm
February 14 at 6:43pm
पाचगणी पोलीसांनी कारवाई न केल्यास आंदोलन: पावसकर
सातारा : 14
सध्या हिंदुत्ववादी पुरस्कृत केंद्र व राज्यात सरकार आहे. पण आजही हिंदु धर्माचा त्याग करून अन्य धर्मात अमिषे दाखवून सक्ती करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूलमध्ये शालेय फी माफ करून ‘बहाई’ धर्म स्विकारण्याची सक्ती करण्याचा भांडाफोड या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी हिंदु एकता आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायक पावस्कर, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे यांनी पत्रकार परीषदेत केली. दरम्यान पाचगणी पोलीसांनी न्यू एरा टिचर स्कूलवर कारवाई केली नाहीतर हिंदु एकता आंदोलन छेडेल असा इशारा पावसकर यांनी दिला आहे.
जितेश परमार व त्याची बहिण रविता परमार यांनी(रा. आग्रा) यांनी पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूलमध्ये जुन 2017 मध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी 1 लाखा 15 हजार शालेय फि भरण्यात आली होती. या शाळेची एकूण फी 2 लाख 34 हजार ही एका वर्षासाठी आहे. ही फी बहाई धर्म स्विकारल्यास माफ केली जाईल असे सांगून बहाई धर्माची शिकवण देण्यात आली. काहीवेळा धमकीसुध्दा देण्यात आली. तसेच सायंकाळी 6 नंतर धर्म प्रचारासाठी विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा. भाग न घेतल्यास विद्यार्थ्यांना 500 रूपये दंड आकरला जात होता. ज्या विद्यार्थ्यांनी नकार दिला, त्यांना शालेय व निवास सुविधा बंद करण्यात येवून त्यांचे साहित्य बाहेर फेकण्यात आले. या शाळेतील शिक्षक भरत, सपन सिन्हा, चित्ररंजन यांनी रजपूत असलेल्या परमार बहिण भावंडांना हाकलून लावले. याबाबत सामेवार दि. 12 फेब्रुवारी रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही पाचगणी पोलीसांनी कोणालाही अटक केलेली नाही. सध्या रस्त्यावर रहाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली असून त्यांना देव देवतांचे फोटो व पुजा करण्याची मनाई करण्यात आलेली आहे.
सात वर्षापर्वी पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूल विरोधात तक्रार झाल्यानंतर संस्थेने माफीनामा लिहुन दिला होता. तरीही धर्मांतराची सक्ती होत असल्याने या शाळेतील व्यवस्थापन, शिक्षक व कर्मचारी तसेच संस्थासंचालक शेरॉम, कतारवरून आलेले सेवामिस यांची चौकशी होवून मागणी विनायक पावसकर यांनी केली आहे. पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहा. पो. नि. तृप्ती सोनावणे यांच्याकडे तपास सुरू आहे. तक्रारदार विद्यार्थ्यांच्या जीवीताला धोका असताना पोलीस कारवाई करत नाहीत. पाचगणी पोलीसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेवून पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूलच्या संस्थाचालक व शिक्षकांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाहीतर हिंदु एकता आंदोलन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा पावसकर यांनी बोलताना दिला.
0 comments:
Post a Comment